Saturday , June 3 2023
Breaking News

रुग्णवाहिकाचालकांचा पगार रखडला; ठेकेदाराची टाळाटाळ, आरोग्य खात्याचे दुर्लक्ष

मुरूड : प्रतिनिधी

येथील ग्रामीण रुग्णालयातील 102 नंबर रुग्णवाहिका चालकांचे मागील तीन महिन्यापासून वेतन रखडले असून आरोग्य खात्याचे दुर्लक्षामुळ या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना काळवूनसुद्धा वेतन मिळत नसल्याने हे रुग्णवाहिका चालक हवालदिल झाले आहेत. आरटीपीसीआर नमुने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, औषधे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनची ने-आण करणे, अतितातडीच्या रुग्णास जिल्हा रुग्णालय व अन्य हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, गरोदर मातांना घरातून रुग्णालयात आणणे, त्यांना प्रसूतीनंतर त्यांच्या घरी  सोडणे आदी स्वरूपाची कामांसाठी ग्रामीण रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेचा उपयोग केला जातो. त्यासाठी मुरूड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक 24 तास गरज लागेल तेव्हा काम करीत असतात. भोपाळ येथील अ‍ॅशकॉम मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 102 रुग्णवाहिका चालकांना पगार दिला जातो. मात्र मुरूडसह पनवेल, अलिबाग, रोहा, उरण, कर्जत, खालापूर, महाड, रोहा आदी तालुक्यातील रुग्णवाहिका चालकांना मागील तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही. ठेकेदार कंपनीला फोन केल्यानंतर एक किंवा दोन महिन्याचा पगार दिला जातो. तोही कधी पूर्ण तर कधी अर्धा मिळतो असतो. संबंधित ठेकेदार या चालकांना मासीक 8983 रुपये वेतन देतो. केंद्र शासनाने 102 नंबर रुग्णवाहिका चालकांचे  किमान वेतन 18 हजार रुपये केले असतानाही संबंधित ठेकेदार या चालकांना कमी पगार देऊन त्यांची पिळवणूक करीत आहे.

मागील तीन महिन्यापासून आम्हाला पगार मिळालेला नाही. त्याबाबत जिल्हा चिकित्सकांनासुध्दा निवेदन दिले आहे. आम्हला पगार वेळेवर मिळत नाही. पगार वेळेवर व्हावेत, हीच आमची मागणी आहे.

-निकेतन सुर्वे,  रुग्णवाहिका चालक, मुरूड.

 

रुग्णवाहिका चालकांना पगार मिळत नाही, याची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकार्‍यांना देणार आहोत. त्यांचा पगार होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

-डॉ. विजय हडबे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply