Breaking News

विराट बनला हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय कर्णधार विराट कोहली याने विश्वचषक क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा तो विश्व क्रिकेटमधील विसावा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने 25 डावांत खेळताना 1029 धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 45 सामन्यांमध्ये 44 डावांत खेळताना 2278 धावा केल्या होत्या. सचिनने 1992 ते 2011 या कालावधीत झालेल्या सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळताना सहा शतके आणि 15 अर्धशतके झळकाविली, तर माजी कर्णधार सौरव गांगुली याने 21 विश्वचषक सामन्यांतून खेळताना 1006 धावा केल्यात. गांगुलीने विश्वचषकात चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply