Breaking News

काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे

लाहोर : वृत्तसंस्था

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. काश्मीर प्रांत आपल्याकडे घेण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती केल्याचा इतिहास आहे. त्यात काश्मीरमधील काही फुटीरवादी नेत्यांनाही पाककडून फूस लावली जात आहे. त्यामुळे येथील परिस्थिती नेहमीच तणावजन्य असते. या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. त्याने त्याच्या ’गेम चेंजर’ या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा, असा दावा केला आहे.

काही महिन्यांपूर्वी आफ्रिदीने काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान सरकारलाच घरचा आहेर दिला होता. तो म्हणाला की, पाकिस्तानला काश्मीर नकोय. तो भारतालाही देऊ नका. काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवंय, जेणेकरून माणुसकी जिवंत राहील. तेथील लोकांना नरकयातना भोगण्यास भाग पाडू नका. पाकिस्तानला खरंच काश्मीर नकोय. त्यांना चार प्रांत सांभाळता येत नाहीत.

आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात याच मुद्द्याचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की, काश्मीर हा काश्मिरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार्‍या आफ्रिदीने पाकिस्तानकडून 398 वन डे सामन्यांत 8064 धावा केल्या आहेत आणि त्यात 6 शतके व 39 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या नावावर वन डेत 395 विकेट्सही आहेत. 27 कसोटी सामन्यांत त्याने 1716 धावा केल्या असून, 48 विकेट्स घेतल्या आहेत.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply