आमदार महेश बालदी यांची विशेष उपस्थिती
उरण : वार्ताहर
उरण येथे बीएपीएस स्वामी नारायण संस्कार केंद्राच्या कामाचे भूमिपूजन व खातमुहूर्त कुंभारवाडा येथे गुरुवारी (दि. 10) झाले. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह मुंबई (दादर) येथील स्वामी नारायण मंदिराचे पूज्य कोठारी अभयस्वरूप दास स्वामी, अक्षर चरितदास स्वामी, प्रसन्न मुनिदास स्वामी, सोबत 18 संत या वेळी उपस्थित होते.
आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, बीएपीएस स्वामी नारायण संस्कार केंद्र होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व उरणवासीय स्वामी नारायण परिवारचे आभारी आहे. उरणला समुद्र पाहण्यासाठी लोक येत असतात, परंतु या पुढे बीएपीएस स्वामी नारायण संस्कार केंद्र पाहतील ही आनंदाची गोष्ट आहे. सर्व संतांची कृपादृष्टी उरण वासीयांवर आहे. संस्कार केंद्र झाल्याने लहानमुलांवर चांगले संस्कार व आचार रुजतील त्यांच्या विचारांमध्ये बदल होईल.
दत्ताराम नाखवा यांनी निशुल्क मंदिरासाठी जागा दिली. मंदिरासाठी ज्या दानशुरांनी मदत केली आहे. अश्या व्यक्तींचे संतांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजू ठाकूर, उद्योजक राजा पडते, माजी नगरसेवक राजेश कोळी, दत्ताराम नाखवा, आर्किटेक चेतन वाजेकर, राजेश पटेल, कनु पटेल, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, महादेव ढोले, परबत मेर, नंदकुमार दर्जे, चिराग पटेल, तनसुख जैन, महाराष्ट्रतील बीएपीएस स्वामी नारायण मंदिराचे ट्रस्टी जयेंद्र पटेल, रजनी अजमेरा, दीपक पटेल, नवी मुंबईचे शैलेश अग्निक, जेठा प्रजापती, हितेश रामपरिया, जयंती डोडिया, राजू पटेल, शशिकांत कोळी, हरी आयत्या कोळी, राजेश कोळी, श्याम कोळी, अविनाश कोळी, शिवदास कोळी, शोभा कौशिक शाह, पारूल पटेल, पिनल पटेल, चेतना कोळी, मीना पटेल, जयाबेन पटेल, कीर्तन पटेल, करण ठक्कर, कल्पेश ठक्कर, रोशन खारोल, रोहन पटेल, नमन शाह, वासंती कोळी, चिराग पटेल, हर्ष चौरसिया
आदी उपस्थित होते.