Breaking News

भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहाराचे वृत्त निराधार

आमदार महेश बालदी यांनी नतद्रष्टांचा घेतला समाचार

उरण : रामप्रहर वृत्त
भिवंडीवाला ट्रस्ट जमीन गैरव्यवहार अशा आशयाचे वृत्त दै. सामना आणि एका स्थानिक वर्तमानपत्राने मंगळवारच्या (दि. 5) अंकात प्रसिद्ध केले आहे, मात्र हे वृत्त पूर्णत: निराधार असून उरण विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून माझी बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया उरणचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांनी दिली आहे. या वृत्ताचे खंडन करतानाच आमदार बालदी यांनी नतद्रष्टांचा आपल्या खास शैलीत समाचारही घेतला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार महेश बालदी म्हणाले की, मी कोणत्याही ट्रस्टकडून जमीन घेतलेली नाही. जो व्यवहार केलाय तो पारदर्शक असून निवडणूक शपथपत्रातही नमूद  केलेला आहे. या व्यवहाराबाबत एलटी मार्ग पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा नोंदविला गेलेला नाही. कोणतरी व्यक्ती जाऊन अर्ज करते आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला काळीमा फासणारे काही पत्रकार पैसे कमविण्यासाठी शहानिशा न करता अशा बातम्या देतात. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.
मी भिवंडीवाला परिवाराकडून जमीन घेतली असून कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चौकशीला बोलविले तरी त्यास उत्तर देऊ तसेच सहकार्य करू, असे सांगून माझ्या माध्यमातून उरण मतदारसंघात विकासाचा बॅकलॉग भरून काढला जात असल्याने मी कुठे अडकतो का यासाठी रिकामटेकडे उद्योग सुरू आहेत, मात्र त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. कुणीही कितीही अडथळे आणले तरी उरण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव झटत राहीन, असेही आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply