Saturday , June 3 2023
Breaking News

भाजप नेते किरीट सोमय्यांना कर्नाळा बँक ठेवीदारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेत झालेला कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आणून ठेवीदार आणि खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळवून देण्याची आशा पल्लवित करून ती सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाढदिवसानिमित्त खातेदार आणि ठेवीदारांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
‘आम्हाला माहीत आहे कोणाच्या कर्तृत्वामुळे कर्नाळा बँक ठेवीदारांना पैसे मिळणार आहेत. शेकापचा आमदार किंवा कोणताही पदाधिकारी खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी का पुढे आला नाही, असा रोखठोक सवाल ठेवीदार मच्छिंद्र कटेकर यांनी उपस्थित करून आमच्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे किरीट सोमय्या यांना दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर भाजप सहकार सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कुंडलिक काटकर यांनी, भ्रष्टाचार करणार्‍यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे किरीट सोमय्या यांच्या तत्परतेमुळेच कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना आणि खातेदारांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस नेहमीच आठवणीत राहील, अशी भावना व्यक्त केली.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply