महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ दासगाव गावानजीक रविवारी (दि. 13) पहाटे 5.40 वाजण्याच्या सुमारास एका वळणावर स्कॉर्पिओवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला 25 फूट खोल खड्यात पडली. या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
डोंबिवली ते सातारा जाणारी स्कॉर्पिओ (एमएच 01 बी एफ -5452) ही रस्त्याच्याकडेला 25 फूट खड्डयात कोसळली. या अपघातात वैभव वसंत कदम (वय 25), धीरज वसंत कदम (वय 28), कविता धीरज कदम (वय 26), विमल वसंत कदम (वय 45), सुनील भागवत कदम (वय 30), योगिनी सुनील कदम (वय 36), विराज बाबू कदम (वय 10), अन्वी सुनील कदम (वय 4), ध्रुवी धीरज कदम (वय 2) वर्ष सर्व राहणार डोंबिवली असे नऊ प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.