Breaking News

नवी मुंबई बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात 4500 क्रेट दाखल झाले असून यामध्ये 3000 क्रेट महाबळेश्वर पाचगणी तर एक हजार 500 क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत. बाजारात नोव्हेंबरअखेरीस तर डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते, परंतु या वेळी अवकाळी पावसाने सुरुवातीच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबला होता.

नवी मुंबई एपीएमसी बाजारात नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात हंगाम सुरू होतो. डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन कमी झाले होते. डिसेंबर महिन्यात 200 ते 300 क्रेट दाखल झाली होती, ही आवक वाढून बाजारात आता 4500 ते  क्रेट स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.

अवकाळी पावसाने ऐन हंगाम उत्पादन फटका बसला होता. त्यामुळे आवक उशीराने झाली. आता उष्ण दमट हवामान असून बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.  बाजारात प्रतिकिलो स्ट्रॉबेरीला  160-280 रुपये बाजारभाव आहेत.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply