Breaking News

महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभेची युवा कार्यकारीणी जाहीर

पेण : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभा कोकण विभाग अध्यक्ष व भाजप ओबीसी मोर्चाचे कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतिश भालचंद्र वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व युवा कार्यकारिणी पेण येथे झाली. या सभेमध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदी सिध्दांत शेलार (खोपोली), युवा कार्याध्यक्ष चंद्रकांत निगडे (उसरबुद्रुक माणगाव), युवा सचिव प्रथमेश काळे (नागोठणे), युवा उपाध्यक्ष नरेश राऊत (पाली), निलेश लोखंडे (पेण ), युवा खजिनदार उदय महाडीक (खोपोली), युवा उपकार्याध्यक्ष राजेंद्र वाचकवडे (कोलाड), युवा उपसचिव प्रवीण राणे (अलिबाग), युवा सदस्य अविष्कार झगडे (वेळास), वैभव पिंगळे (कर्जत), संजय शेडगे (महाड) व रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र महाडिक आदींच्या नियुक्तया करण्यात आल्या.

या सभेसाठी कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे, रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश महाडिक, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पोटे, कोकण विभाग युवा अध्यक्ष संतोष रहाटे, पेण तालुका अध्यक्ष जितेंद्र लोखंडे, शहर अध्यक्ष गणेश शेलार, शहर सचिव संतोष टेकावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. दिगंबर महाराज राऊत, रोहा तालुका अध्यक्ष संतोष कोते तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. या सर्वांनी नवनिर्वाचित युवा कार्यकारीणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply