Breaking News

अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त परिसर सुशोभित; पनवेल मनपा सफाई कर्मचार्‍यांची अनोखी युक्ती

कळंबोली : प्रतिनिधी

कळंबोली सेक्टर 1 येथील मोकळ्या भूखंडावर सफाई कर्मचार्‍यांच्या वतीने सुशोभित असे रंगरंगोटी करून तिथल्या परिसराला एक वेगळच सौंदर्य निर्माण करून दिले आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांचे कौतुक येथील रहिवाशांनी केलेले आहे. कळंबोली सेक्टर 1 याठिकाणी असलेल्या मारुती मंदिराजवळ असलेल्या क्रिकेट मैदाना शेजारील एका जाग्यावर नेहमीच मो्या प्रमाणात कचरा सोप्या पद्धतीने टाकला जात होता. त्यामुळे या ठिकाणी वारंवार दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. वारंवार सूचना देऊनदेखील काहीजण याठिकाणी कचरा अस्ताव्यस्त फेकत असल्याने या जागेच्या स्वच्छतेसाठी पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी एक युक्ती लढवली. त्यांनी या परिसरात टायर, प्लस्टिकचे डब्बे, बाटल्या, लाकडे फेकलेल्या वस्तूंच्या माध्यमातून परिसराला रंगरंगोटी करून त्या ठिकाणी विविध प्रकारची फुलझाडे यांची लागवड केली. त्यामुळे नेहमी दुर्गंधीयुक्त दिसणारा परिसर आत्ता सुशोभीकरणाचे नटलेला आहे. या सुंदर कामाचे कौतुक परिसरातील नागरिकांनी केलेले असून सफाई कर्मचारी तसेच बोर्ड अधिकारी आरोग्य निरीक्षक पर्यवेक्षक यांचे कौतुक केले जात आहे. वॉर्ड अधिकारी सदाशिव कवटे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, दिग्णेश भोईर, दीपक गवळी, राजेंद्र जाधव, विशाळ खानावकर, सागर कोळेकर यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply