Breaking News

हॉटेलमधून मोबाइल चोरणारा गजाआड

पनवेल ः वार्ताहर

हॉटेलमधील टेबलावर एका ग्राहकाने ठेवलेले दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी भुरट्या चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचे 2 मोबाइल हस्तगत केले आहेत.

तालुक्यातील कल्हे गाव येथील किंग्स हॉटेलमध्ये एका ग्राहकाने त्यांच्या टेबलावर ओप्पो आणि व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन ज्याची किंमत एकूण 23 हजार रुपये इतकी आहे हे ठेवले असताना आरोपीने चलाखीने सदर मोबाईल फोन चोरून नेले. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच, पोलीस पथकाने त्या हॉटेल परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना लाल टी-शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीने हे मोबाइल चोरुन हॉटेल बाहेर पडल्याचे दिसले. त्यानुसार परिसरातील गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीची माहिती काढून किरणकुमार शंकरअय्या कनाकम (35 रा.खारघर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने हॉटेलमधून मोबाइल चोरल्याचे कबूल करून मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply