अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणार्या रायगड भूषण पुरस्काराचे रविवारी (दि. 6) गोंधळात वितरण करण्यात आले. यंदा तब्बल 257 जणांची निवड करण्यात आली होती. अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. 257 जणांना पुरस्काराचे एकाच कार्यक्रमात वितरण करण्यात आले. एकावेळी पाच जणांची नवे पुरकारून पुरस्कार वितरण केले जात होते. ढिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. आपल्या तालुक्यातील पुरस्कार विजेत्यांसोबत नेते व्यासपीठवरच फोटो काढण्यात व्यस्त होते. पुरस्कार विजेत्यांनी कॉरिडॉरमध्ये गर्दी केली होती. अखेर निवेदकांना या सर्वांना समाज द्यावी लागली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पुरस्काराचे वितरण होत असल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये टिका झाली होती. त्याची दखल पालकमंत्री अदिती तटकरे यांनी घेतली. रायगड भूषण पुरस्काराचे वितरण प्रत्येक वर्षी करावे. त्यांची संख्या मर्यादित ठेवावी अश्या शब्दात पालकमंत्री आदिती तटकरे यांना आयोजकांना सल्ला द्यावा लागला. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घरे, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती अॅड. नीलिमा पाटील, कृषी सभापती बबन मानवे, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव आदी या वेळी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील गुणवंतांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी रायगड भूषण हा पुरस्कार सुरू करण्यात आला. रायगड भूषण हा जिल्ह्यात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार आहे. आपआपल्या क्षेत्रात काम करून जिल्ह्याची सामाजिक स्थिती सुधारण्यास हातभार लावला आहे. अशा व्यक्तींना रायगड जिल्हा परिषद रायगड भूषण पुरस्कारासाठी निवड करणे अपेक्षित आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper