Breaking News

खारघरमधील पाणी प्रश्न पेटला

भाजप पदाधिकार्‍यांचा सिडको अधिकार्‍यांना घेराव

खारघर ः रामप्रहर वृत्त

खारघर शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर भाजपचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत रविवारी (दि. 20) थेट खारघर गोल्फ कोर्सवरच अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला.

मागील काही दिवसांपासून खारघर शहराला सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. भाजपच्या नगरसेवक व पदाधिकारी यांनी सिडको प्रशासनासोबत अनेक वेळा पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनसुद्धा यावर काहीही मार्ग निघत नव्हता. या प्रश्नावरून सिडकोचे अधिकारी नगरसेवकांना टाळाटाळ करीत असल्याने रविवार सुटीचा दिवस असल्याने भाजप नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट गोल्फकोर्समध्ये धाव घेतली.

यावेळी खारघर शहरातील पाणी समस्येचा पाढाच अधिकार्‍यांसमोर वाचून टँकर धोरण कुचकामी असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. एकीकडे उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार हे माहित असून देखील पाण्याचा पुरवठा वाढविण्याऐवजी सिडको वारंवार शटडाऊन करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

या वेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक रामजी बेरा, नगरसेवक नीलेश बाविस्कर, नगरसेविका अनिता पाटील, प्रभाकर जोशी, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, अमर उपाध्याय, किरण पाटील, समीर कदम, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, युवाध्यक्ष विनोद घरत, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष रमेश खड़कर, संध्या शरबीद्रे, मोना आडवाणी, संजय घरत, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, साधना पवार, प्रतीक्षा कदम, मधुमिता जेना, श्यामला शेट्टीगर, शोभा मिश्रा, संदीप रेड्डी, कांचन बिर्ला, विनोद ठाकूर, संजना कदम, माळी, अशोक पवार, शैलेंद्र त्रिपाठी यांच्यासह नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करणार

सिडकोचे पाणीपुरवठा विभाग अधीक्षक अभियंता पी. व्ही. मूल यांनी नवी मुंबई महानगरपालिकेशी चर्चा करून अतिरिक्त पाण्याची उपलब्धता करून येत्या 15 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply