पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या ‘तुंबई’ या नाट्यप्रयोगाला शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल ‘तुंबई’च्या संपूर्ण चमूचे अभिनंदन होत आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मार्गदर्शन कला क्षेत्राला सातत्याने मिळत असते. त्या अनुषंगाने ‘तुंबई’ या नाटकाचे सादरीकरण राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 60व्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्राथमिक
फेरीत झाले होते. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगास रसिकांनी दाद दिली.
‘तुंबई’चे लेखक चैतन्य सरदेशपांडे, दिग्दर्शक गणेश जगताप असून प्रकाश योजना श्याम चव्हाण यांची, नेपथ्य व संगीत कलादर्पण संस्थेचे, गीत गणेश जगताप, सूत्रधार अभिषेक पटवर्धन, तर रंगमंच व्यवस्था टीम अटल करंडकने पाहिली. अभिजित झुंजारराव
व प्रफुल गुरव यांचे सहकार्य लाभले. या नाट्यप्रयोगास तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याने सर्वांचे अभिनंदन होत आहे.
Check Also
Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen
Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …
RamPrahar – The Panvel Daily Paper