Breaking News

गाडीच्या धडकेत 70 वर्षीय महिला जखमी

पनवेल : रामप्रहर वृत्त

सायन पनवेल हायवेवर एका अज्ञात गाडीच्या धडकेत 70 वर्षीय महिला जखमी झाली असून या महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकुबाई दत्तु पवार या कोपरा गावात हळदीच्या कार्यक्रमाला निघाल्या होत्या. त्या जाधववाडीसमोरील सायन पनवेल हायवेने रस्ता क्रॉस करून रिक्षा पकडून कोपरा गाव येथे जायचे असल्याने सायन-पनवेल हायवेवर उभ्या असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply