Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमधील मिठास दुकानाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

तक्का सिग्नलजवळ नव्याने मिठास स्वीट कॉर्नर हे दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या.

पनवेल शहरातील तक्का सिग्नल जवळ सोमनाथ देवकर, नथाराम चौधरी आणि जगदिश जाट यांनी ‘मिठास’ हे स्वीट कॉर्नर सुरु केले आहे. या कॉर्नरचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल परिसरामध्ये देशाच्या कानाकोपर्‍यानतू नागरिक वास्तव्याला आहेत. त्यांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात घेऊन विविध पदार्थ या दुकानामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे मिठाच्या माध्यामतून रुचकर आणि दर्जेदार अशा पदार्थांचा आस्वाद पनवेलकरांना घेता येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीकरीता सदीच्छा दिल्या.

या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, अमर पाटील, अजय बहिरा, प्रवीण पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा आदी उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply