पनवेल : प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी पनवेल शहरात सकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी विविध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिली.
पनवेल महापालिकेत गुरुवारी (दि. 7) महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131च्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमाची रूपरेखा ठरवण्यासाठी शासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांची बैठक बोलावली होती. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिति अध्यक्ष नरेश ठाकूर, महिला व बाला कल्याण सभापती हर्षडा उपाध्याय, नगरसेवक प्रकाश बिनेदार, सुशीला घरत, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, परिवहन विभागाचे पोलिस अधिक्षक खंडागळे, शाळांचे मुख्याध्यापक व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी महापौरांनी कोरोनामुळे दोन वर्षे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता आली नव्हती आता बंधने उठली असल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणूक सुरू होऊन आंबेडकर भवनाजवळ याची सांगता होणार असल्याचे महापौरांनी सांगितले तसेच या मिरवणूकीत लेझीम, ढोल-बॅण्ड पथक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ बनविण्यात येणार आहेत. उत्कृष्ट चित्ररथाला अनुक्रमे 35 हजारचे, 25 हजाराचे, 20 हजाराचे बक्षिस आयोजित करण्यात आले आहे. याबरोबरच सामुहिक गायन मंडळेही यामध्ये असणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आधारित महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने निघणार्या मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी विविध कमिटी या वेळी स्थापन करण्यात आल्या. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी लोकसहभागातून होणार्या या मिरवणूकीसाठी विविध सूचना या बैठकीत मांडल्या.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …