Breaking News

‘अंनिस’तर्फे देहदान, अवयवदान जनजागृती

नवी मुंबई : बातमीदार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, घणसोली शाखेतर्फे देहदान व अवयवदान जागरूकता अभियान राबविण्यात आले.

आपण हयात असताना समाजाला अन्नदान, जलदान, ज्ञानदान, रक्तदान इत्यादी दान करतो व समाजाप्रती आपले दायित्व पार पाडत असतो. आपण दिवंगत झाल्यावर आपल्या शरीराचे दहन, दफन अथवा जलदान करून ते नष्ट केले जाते. असे न करता आपल्या शरीरातील उपयुक्त अवयव मृत्यूनंतर दान केल्यास गरजू व्यक्तींना त्यांच्या उपयोग होतो. जसे की नेत्रदानाने अंध व्यक्तींना दृष्टी मिळते. त्वचा दानाने त्वचा भाजलेल्या व्यक्तींवर त्वचा रोपनकरून नवीन जीवन मिळू शकते. प्रसंगी मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, यांचे दान केल्याने रूग्णानां नवीन जीवन मिळते.

जनमानसात अवदान व देहदान याबद्दल जागरूकता व्हावी म्हणून हे अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत देहदान व अवयवदानाचे फलक घेऊन कार्यकर्ते उभे होते व त्यांनी नागरीकांशी सवांद साधला. सदर कार्यक्रम शुक्रवारी (दि. 8) घणसोली, सेक्टर 12 मधील साईबाबा मंदिराजवळ झाला. या उपक्रमात गजानंद जाधव, प्रकाश माळवे, उत्तम रोकडे व अशोक निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply