Breaking News

पारवाडी-आदिवासीवाडी तहानलेली

पाणी टंचाई नियोजनासाठी आमदार गोगावलेंनी कंबर कसली

महाड : प्रतिनिधी : तालुक्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत. तालुक्यातील पारवाडी या आदिवासीवाडीला सध्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने आदिवासींना नदीमध्ये डबकी खोदून त्यातील पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. आमदार भरत गोगावले हे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्वतः  लक्ष देवून कार्य करत आहेत. महाड तालुक्यातील पारवाडी येथील उगवत आदिवासीवाडी आहे. गेले अनेक वर्षामध्ये सातत्याने या वाडीला पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. या आदिवासीवाडीवर 60 घरे असून वाडीवर जाण्यासाठी यावर्षी रस्ताही झाला आहे. वाडीला कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे स्थानिकांना ओढा व विहिरीतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. उन्हाळ्यात नदी व ओढे कोरडे पडून त्यातील दगडगोटे दिसू लागतात. आणि विहीरीतील पाणीही तळ गाठते. अशावेळी आदिवासींची पायपीट सुरू होते. पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतर कापावे लागते. अनेकदा हे आदिवासी नदीतील रेती व गोटे बाजूला करून त्यात छोटी छोटी डबकी तयार करतात व या डबक्यातून वाटी वाटीने पाणी भरून आपली गरज भागवत असतात. या नदीमध्ये एक विहीर  खोदावी अशी मागणी आदिवासींनी अनेक वर्ष पंचायत समितीकडे केली आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ही बाब आमदार गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिली असता, शिवसेनेकडुन या वाडीवर एक बोअरवेल मारण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी विज पुरवठा नसल्याने या बोअरींगचा पंप नादुरुस्त झाला आहे. या ठिकाणी हॅन्ड पंप बसविला तर तुर्तास या वाडीवरील पाणी प्रश्न मिटणार आहे. आमदार गोगावले यांनी तात्काळ सभापती मालुसरे यांना सूचना करुन, या ठिकाणी त्वरीत हॅन्ड पंप बसवा, अन्यथा माझ्या खर्चाने हा पंप बसवतो, असे सांगितले.

संबधीत ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठ्याबाबत मागणी आल्यास त्यांना त्वरित टँकरने पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल, व इतर उपाययोजना करण्याबाबत विचार केला जाईल.

– प्रमोद गोडांबे, गट विकास अधिकारी, महाड

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply