Breaking News

पनवेल तालुक्यात शेकापला आणखी एक हादरा

जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, शेखर कानडे करणार भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे व त्यांचे असंख्य सहकारी येत्या शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी 7 वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शेकापला पनवेल तालुक्यात आणखी एक मोठा हादरा बसणार आहे.
आपटा गावातील मैदानावर हा सोहळा होणार असून या वेळी भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांचे स्वागत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply