रोशन खडे ठरला ‘खोपोली श्री’चा मानकरी

खापोली ः प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीपक ब्रदर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी गायकवाड आणि पदाधिकार्‍यांच्या पुढाकारातून रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने या वर्षीही खोपोली श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. स्पर्धेत चार वेगवेगळ्या गटांत 69 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत मुंबई पोलीस दलातील रोशन खडे खोपोली श्री किताबाचा मानकरी ठरला. खोपोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील पटांगणात खोपोली श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या वेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत पुरी, अंकीत साखरे, शेखर पिंगळे, भूषण पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते मारूती आडकर, आयोजक विकी गायकवाड, अमित पवार आदी उपस्थित होते. स्पर्धेतील 50 ते 55, 55 ते 60, 60 ते 65, 65 ते 70 आणि 70 किलो वजनी खुला गटामध्ये मिळून 69 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत  मुंबई पोलीस रोशन खडे याने खोपोली श्री किताबाचा बहुमान पटाविला. त्याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर बेस्ट पोझर सलमान नालबन, बेस्ट बॉडी इम्प्रूव्हमेंट इजाज शेख या विजयी स्पर्धकांनाही बक्षीस देण्यात आले. पारितोषिक वितरण माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, नगरसेवक मनेष यादव, सामाजिक कार्यकर्ते रवी रोकडे, विनायक तेलवणे, विशाल गायकवाड, भास्कर लांडगे, राजू गायकवाड, अनिल गायकवाड, प्रशांत मांगुळकर यांच्या उपस्थितीत झाले.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply