Breaking News

नवी मुुंबईत 68 ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’

स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम; संकल्पनेला प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या अशी संकल्पना राबविण्यात आली असून शहरातील महत्त्वाच्या 68 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याकडील जुने मात्र चांगल्या स्थितीतील कपडे, चप्पल, बूट, भांडी, खेळणी, अंथरुण -पांघरुण आणि पुस्तके ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या जीवनावश्यक वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी त्या परिसरातील स्वच्छता पर्यवेक्षक, स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पालिकेच्या या  उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात असून नागरिकांचाी आहे.

नवी मुंबई पालिकेने कपडे, चप्पल, बूट, खेळणी, अंथरुण-पांघरुण पुस्तके आणि इतर वापरातील नाशिवंत नसलेल्या जीवनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी 15 ते 20 खणांचे एक लोखंडी कपाट ठेवण्यात आले आहे. यातील प्रत्येक खणावर वस्तूचे नाव लिहिलेला फलक लावला आहे. बेलापूर येथील कॉम्रेड भाई पाटील चौकाजवळ तसेच आर्टिस्ट व्हिलेजमध्ये अशा प्रकारचे माणुसकीच्या खणांचे कपाट ठेवले असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कपाटांची मागणी वाढत असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब रांजळे यांनी सांगितले. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून उभ्या राहणार्‍या या माणुसकीच्या कपाटांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

हवे ते घेऊन जा… नको ते ठेवून जा

तुम्हाला हवे असलेले घेऊन जा आणि नको असलेले घेऊन या आणि ते या माणुसकीच्या कपाटात ठेवून जा असा संदेश दिला जात आहे. या महागाईच्या काळात गरीब गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply