श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालयाला बेस्ट स्कूल पुरस्कार

नवी मुंबई ः प्रतिनिधी

ठाणे दिवा येथील श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालय या शाळेने कोरोना काळात सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेत राज्यस्तरीय बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मेस्टा अधिवेशन नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुख्य सभागृहात झाले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री सचिन अहिर, ऑस्ट्रेलियन शिक्षण तज्ज्ञ, मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी अनेक उपक्रम राबविते. मेस्टाच्या मागण्या रीतसर असून त्या सोडविण्यासाठी आपण निश्चित सकारात्मक प्रयत्न करू आणि काही दिवसातच तुम्हाला हे दिसून येईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इंग्रजी शाळा संचालकांना आश्वस्त केले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply