सुकापूरमध्ये कायदेशीर सल्ला कार्यालय सुरू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

सुकापूर येथे अ‍ॅड. निलम भोसले आणि प्रा. प्रफुल भोसले यांनी ‘बाबासाहेब्स लीगल असोसिएटस्ट’ हे कायदेशीर सल्ला देणारे कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 3) उद्घाटन झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भोसले दाम्पत्यांनी सुरू केलेल्या या नवीन कार्यालयाच्या पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुकापूरच्या सरपंच योगिता भगत, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्या प्राची जाधव, महेश पाटील, प्रमोद भगत, पुष्पा म्हस्कर, अनीता पाटील, अशोक पाटील, आत्माराम पाटील, उदय म्हस्कर, उदय पोपेटा, रुपेश पाटील, मोहन दळवी, अनिकेत पाटील, राजेश पाटील, नरेंद्र गायकवाड यांच्यासह भोसले कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, प्रगती करायची असेल तर सर्व अडचणींवर मात करावी लागते त्यावेळी वकील मंडळींचा मोठा फायदा होतो. त्यामुळे  ‘बाबासाहेब्स लीगल असोसिएटस्ट’च्या माध्यमातून अनेकांना कायदेशीर सल्ला मिळेल अशी आशा व्यक्त करून पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply