Breaking News

पनवेल देवीचा पाडा येथील शेकापच्या माजी सरपंचासह समर्थक भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या देवीचा पाडा येथील माजी सरपंच सविता फडके आणि रामदास फडके यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (दि. 8) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते राम पाटील, अशोक साळुंखे, काळुराम फडके, महेंद्र म्हात्रे, विनोद म्हात्रे, रामाशेठ पाटील, महेश पाटील, विजय पाटील, एकनाथ फडके, हनुमान खुटले, भालचंद्र पाटील, अजय चिखलेकर, अतुल चिखलेकर, आकाश फडके, शुभम राऊत, हरिश्चंद्र म्हात्रे, संदीप पाटील, विशाल खानावकर, गौरव भोईर, सागर भोईर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात देवीचा पाडा येथील शेकापच्या माजी सरपंच सविता फडके, ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास फडके, सुदेश फडके, एकनाथ फडके, विशाल फडके यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी, भाजपशिवाय जिल्ह्यात कोणताही पक्ष जनतेची कामे निस्वार्थीपणे करण्यास सक्षम राहिलेला नाही, असे सांगत प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply