Breaking News

ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नावडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ बाळाराम खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त नावडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. हरीभाऊ खानावकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नावडे येथे स्व. हरीभाऊ बाळाराम खानावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि भजन या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, भाजप पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर, कमलाकर बाळाराम खानावकर, मोहन बाळाराम खानावकर, मंगेश बाळाराम खानावकर, मीना हरी खानावरक, प्रशांत हरी खानावक यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कुटूंबीय उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply