Breaking News

पनवेलमध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व

भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले मार्गदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवारी (दि. 7) पनवेलमधील एचओसी वसाहतीजवळील आणि सिमरन मोटर्सजवळील आदिवासी वाडीत योजनांची माहिती देण्यात आली.

या वेळी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर सीताताई पाटील, सभापती हेमलता म्हात्रे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, वाहतूक सेल शहर संयोजक के. के. म्हात्रे, ओबीसी मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष आकाश डोंगरे, प्रभाग 18चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभाग 14चे अध्यक्ष गणेश म्हात्रे, प्रसाद कंधारे, विजय डिसोझा, सर्वेश पाटील, नरेंद्र सोनवणे, सुरेश पाटील, हेमंत म्हात्रे, उज्ज्वला पाटील, अनुसूचित जमाती मोर्चाचे महेश वाघे आदी उपस्थित होते

नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे मिळणार आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालये, अन्ना सुरक्षा योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य मिळत आहे. उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस कनेक्शन तसेच ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळाला आहे. यांसारख्या विविध योजनांची माहिती सेवा सुशासन व गरीब कल्याणपर्व कार्यक्रमांतर्गत समाजातील अनुसूचित जमाती (आदिवासी) व गरीब लोकांची भेट घेऊन या घटकांपर्यंत पोहचविण्यात आली, जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply