Breaking News

ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन डी.एन.ई.136 तालूका शाखा उरण जिल्हा रायगडच्या अध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अनिरुध्द पाटील यांची निवड होताच उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष दिलीप तुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तसेच नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई.136 उरण तालुक्याचे अध्यक्ष दिलीप तुरे यांनी आपल्या पदाचा कालावधी संपल्यानंतर राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर उरण पंचायत समितीच्या परिसरात सोमवारी (दि. 13) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्रामसेवक युनियनच्या उरण शाखा अध्यक्षपदी सर्वानूमते आदर्श ग्रामसेवक अनिरुद्ध पाटील निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष अनिता म्हात्रे, सचिव महेश पवार, कोषाध्यक्ष उर्मिला पाटील यांची निवड करण्यात आल्याने उपस्थित युनियनच्या सभासदांनी, उरण पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply