Breaking News

शेकापचे ज्येष्ठ नेते गणेश शेळके, आशुतोष शेळके यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच विकासकामांसाठी भाजपच्या नेतृत्वाला विश्वासात घेतले, तर पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभा राहील, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईतील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश शेळके, आशुतोष शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळी दिली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन शेतकरी कामगार पक्षाचे आदई गावातील ज्येष्ठ नेते गणेश शेळके, आशुतोष शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 27) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांनी भाजपची शाल देऊन त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला भाजप अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी सरपंच महादू शेळके, भाई पाटील, बाळाराम पाटील, जगदीश शेळके, पद्माकर शेळके, मंगेश भोपी, श्रीचन भंडारी, जनार्दन पाटील, विश्वास काथारा, राजेश काकडे, उद्धव पाटील, आकाश मोकल, श्रीपद शेळके, ज्ञानेश्वर भंडारी, राजनाथ शेळके, कैलास पाटील, प्रवीण पाटील, तेजस म्हात्रे, सूरज म्हात्रे, अनिकेत पाटील, विवेक पाटील, रोहित पाटील, सूरज पाटील, मनोज शेळके आदी उपस्थित होते.
या वेळी शेकापमधूून ज्येष्ठ नेते गणेश शेळके, माजी ग्रामपंचायत सदस्य संगीता शेळके, आशुतोष शेळके, तेजस्विनी शेळके, निलेश शेळके, दीपेश शेळके, विकी शेळके, किरण शेळके, संतोष अरुण शेळके, संतोष नारायण शेळके, चिंतामणी शेळके, मयूर शेळके, कबीर शेळके, दत्ता शेळके, चेतन शेळके, प्रणव पाटील, रोहित भोपी, सुनील पाटील, योगेश काकडे, सुनील बेंद्रे, नवनाथ परांगे, विशाल पाटील, राजेंद्र पाटील, अल्पेश शिंदे, आतिष पवार, अक्षय शेळके, रमेश भोगले, रोहन परांगे, विजय विन्हेरकर, अविनाश पाटील, अमित सूर्यवंशी, विकास राजन, विनायक भोपी, कार्तिक खाटपे, करण शेळके, अश्राप खान, रमेश भोगले, अरविंद शाहू, अवधूत मुंडे, विकास शिंदे, प्रदीप म्हात्रे, बाळ वाघमारे, संदीप कोंडेकर, दुर्वेश शिंदे, देवांग शिंदे, ओंकार दापसे, अभिषेक गुरव, हर्ष नागराळे, प्रगती शेळके, मोनिका शेळके, वैशाली साळुंखे, ज्योती मोकाशी, सुखद विन्हेरकर, शोभा चव्हाण, सावित्री गायकवाड, प्रियांका पाटील, त्रिवेणी मोर्या, श्वेता सावंत, सुहासिनी तांबोळी, सविता कोथमिरे, उज्ज्वला चव्हाण, संगीत माने, सुनंदा चव्हाण, छाया भादिगे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून नागरिकांपर्यत पोहचून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा त्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन केले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply