Breaking News

खारघरमधील धोकादायक वृक्षांची छाटणी करावी

भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांचे निवेदन

खारघर ः रामप्रहर वृत्त

खारघर शहरामध्ये असणार्‍या धोकदायक वृक्षांची छाटणी पथके तयार करून करावीत, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.

शहराच्या बहुतांश सेक्टर्समध्ये जुने मोठमोठे वृक्ष रस्त्याच्या कडेला तसेच इमारतींच्या आजूबाजूला लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात जोरदार वार्‍यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडतात. यामुळे जीवितहानी झाली नसली तरी खाली उभ्या केलेल्या गाड्यांचे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान होत आहे. या वर्षीपासून सिडकोने ही झाडे छाटण्याचे काम बंद केले आहे.

गेल्या दोन दिवसांत अशा चार ते पाच घटना घडल्याचे विचारात घेता, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांना खारघरवासियांतर्फे शहरनिहाय वृक्षतोडणी पथके स्थापन करून धोकादायक झाडांची छाटणी तातडीने करण्याबाबतचे निवेदन दिले आहे.

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी याबाबतची गंभीरता लक्षात घेत महापालिकेच्या वृक्ष छाटणी पथकात अधिक मनुष्यबळ वाढवून धोकादायक वृक्षांची छाटणी तातडीने करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply