Breaking News

नवी मुंबईत पावसाचे थैमान

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गेल्या 24 तासांत नवी मुंबईत सरासरी 84.68 मिमी पाऊस झाला. यामुळे एपीएमसी मसाला मार्केट आणि महापे एमएसआरडीसी ते इंदिरा नगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचार्‍यांकडून प्रयत्न सुरू होते. एपीएमसी मसाला मार्केटमधील सखल भागात मध्ये दरवर्षी पाणी साचण्याची घटना घडतात. पावसाचा जोर कायम असल्याने येथे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होतेे. तसेच महापे एमआयडीसी ते इंदिरा नगर भागातील 11 ठिकाणी पाणी साचले आहे. येथील मार्गावर खड्डे पडल्याने पाण्यातून रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक झाली. ठाणे बेलापूर आणि सायन-पनवेल महामार्गावरही काही सखल भागात पाणी साचले. यामुळे महामार्गावरून धिम्यागतीने वाहतूक सुरू होती. दोन ठिकाणी झाडे कोसळली तर एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. मोरबे धरण क्षेत्रात 92.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची पातळी 76.57 मीटरपर्यंत पोहचली आहे. सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे येथे झाला. तर बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली आणि दिघा विभागातही मुसळधार पाऊस झाला.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply