पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातही शिवसेनेत उभी फूट पडली असून सुमारे चारशे पदाधिकारी व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पनवेल महानगर संघटक व माजी नगरसेवक अॅड. प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी दुपारी रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
Check Also
उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …
RamPrahar – The Panvel Daily Paper