पुणे : प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून ते अनुक्रमे 94.90 टक्के आणि 92.71 टक्के असे आहेत.
सीबीएसईतर्फे दहावी, बारावीचे निकाल शुक्रवारी (दि. 22) ऑनलाइन घोषित करण्यात आले. देशातील 14 लाख 35 हजार 366 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील 13 लाख 30 हजार 662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर 20 लाख 93 हजार 978 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील 19 लाख 76 हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Check Also
पनवेल चेरीवली शाळेला संगणक, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेची पनवेल तालुक्यातील …
RamPrahar – The Panvel Daily Paper