Breaking News

खोपोलीतील झेनित धबधब्यावर पुण्याचा पर्यटक जखमी

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर रविवारी (दि. 24) पर्यटनासाठी आलेला पुण्याचा पर्यटक पाय घसरून जखमी झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त मदत टीमच्या सदस्यांनी या पर्यटकाला रुग्णालयात दाखल केले आहे. भागवत कोळपेकवार असे या जखमी पर्यटकाचे नाव आहे. तो मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर आला होता. एका ठिकाणी खडकावर पाय घसरल्याने तो खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या कमरेस गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांच्या खोपोलीतील नातेवाईकांनी अपघातग्रस्त मदत टीमला पाचारण केले. टीमचे प्रमुख गुरुनाथ साठीलकर तसेच प्रल्हाद अत्रे व इतर कार्यकर्ते रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भागवत यांना खोपोलीतील जाखोटीया रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धबधबे, धरणांवर येण्यास प्रशासनाने मज्जाव केला असतानाही पर्यटकांची शनिवारी व रविवारी प्रचंड गर्दी असते. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही पर्यटक नजर चुकून आडमार्गाने धबधब्यावर पोहचत असल्याचे चित्र आहे.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply