Breaking News

देवकुंड धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

स्वराज्य संघटनेने वेधले लक्ष

माणगाव ः प्रतिनिधी

सह्याद्रीच्या खोर्‍यात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा. कुंडलिका नदीचे उगमस्थान देवकुंड धबधबा आहे. पाटणूस पंचक्रोषीतील विठ्ठल नगर भिरा येथून देवकुंड धबधबा येथे जाण्यासाठी साधारण 4  किमी. पायवाट आहे. पायवाट अतिशय  खडतर पण मनोरंजक आहे. वाटेवर हलके पाण्याचे ओढे पर्यटकांना भुरळ पाडतात. या वाटेवर हलके पाण्याचे ओढे पर्यटकांना आकर्षित  करतात. रोजच्या या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर वाहणारा धबधबा म्हणून याची ओळख आहे. या स्थळाला शासनाने पर्यटनाचा दर्जा देऊन पर्यटन स्थळ म्हणून घोषित  करावे, अशी  मागणी स्वराज्य संघटना तथा बौद्ध धम्म संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

देवकुंडच्या चार किमी अंतरावर येणारी वळणे, खोलीचा भाग, पाण्याच्या प्रवाहाचा ठिकाणी असणारे धोकादायक ठिकाणे, दरीचा भाग या ठिकाणी रस्त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, तसेच ओहोळ व नदी या ठिकाणी पूल उभारावेत जेणेकरून सर्व वयोगटातील पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग तयार होईल. देवकुंड धबधब्याकडे जाणार्‍या मार्गात प्रत्येकी 25 मी. अंतरावर दिशादर्शक चिन्हे, रेडियम लावण्यात यावेत. जेणेकरून येणार्‍या पर्यटकांना चुकण्याचे कारण राहणार नाही, तसेच एक किमी. अंतरावर जागोजागी फलक लावण्यात यावेत. धब्याधब्याकडे जाणारे पर्यायी मार्ग दोन आहेत. पावसाळ्यात त्यापैकी ओढे असलेला मार्ग बंद ठेवावा तसेच जो ओढा धोकादायक वाटतो त्या ठिकाणी साकव अथवा पक्का पूल तयार करावा. पर्यटकांसोबत गाईड असणेही आवश्यक आहे. कारण जास्त पाऊस आल्यानंतर ओढे धोक्याची पातळी ओलांडतात अशावेळी गाईडच्या सुचना पाळल्यास सुरक्षितता लाभेल.

पर्यटकांची ग्रामपंचायत पाटणूस कर्मचारी बुथवर नावनोंदणी करीत असतात, पण काही जण गर्दीचा फायदा घेत नोंदणी न करता बुथवरील कर्मचार्‍यांची नजर चुकवून प्रवेश  करतात. तेथे बुथवर आपत्कालीन फोन नंबर दिला जातो. कारण पर्यटकांना काही अडचण आल्यास बुथवर कॉल केल्यास पर्यटकांना वेळीच मदत करण्यात येते. प्रवेश  बुथ केंद्रावर प्रथमोपचारची व्यवस्था, तसेच डॉक्टर ऑन कॉल, स्टेचर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून दरवर्षी संभाव्य दूरघटना घटना टाळता येतील, तसेच पर्यटकांना शासनामार्फत सुरक्षितता पुरवावी. प्रषासनाने या सर्व सुविधांसोबत आवश्यक त्या ठिकाणी साकव, निसरड्या पायवाटेला सुरक्षित कठडे या सोयी पुरविल्यास देवकुंड धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply