Breaking News

घोणसे घाटांत पुन्हा अपघात

दैव बलवत्तर म्हणून वाचला बल्कर

म्हसळा : प्रतिनिधी

माणगाव-दिघी या रस्त्यावरील घोणसे घाटातील केळेवाडी येथील एका तीव्र वळणावर मंगळवारी (दि. 2) भरधाव वेगाने चाललेल्या बल्करचा भिषण अपघात झाला. या अपघातात बल्कर पलटी झाल्यामुळे वाचला अन्यथा तो दरीत कोसळला असता आणि वित्त आणि मनुष्यहानी झाली असती.

सीमेंट बल्कर (एमएच-46,पी-123) जेएसडब्ल्यू वडखळ येथून देवघर (ता. म्हसळा) येथील प्लँटवर जात होता. माणगाव-दिघी या रस्त्यावरील घोणसे घाटातील केळेवाडी येथील शेवटच्या तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून बल्कर पलटी झाला.

अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, तलाठी सुनिल भगत, अमोल शिगवण, देवघर आणि घोणसे ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप महामुनकर, अक्षय खेडेकर, केळेवाडी ग्रामस्थ उमेश गणवे यांनी घटनास्थळी धाव घेत विशेष मदत केली. या अपघाताची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घोणसे घाटातील केळेवाडी येथील शेवटचे तीव्र वळण ते पुढील 500 मीटर क्षेत्र धोकादायक आणि अपघात प्रवण क्षेत्र आहे, वळणावरील थोड्या भागात  संरक्षक भिंत बांधली आहे, आजचा अपघात संरक्षक भिंत संपते तेथेच झाला. त्याच्या पुढे 20 मीटर क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे.

-अनिल महामुनकर, सामाजिक कार्यकर्ते, देवघर-घोणसे

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply