Breaking News

पनवेल-उरणमध्ये मनसेला खिंडार

अनेक पदाधिकार्‍यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला असून नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. आता पनवेल, उरणमधील मनसैनिकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह पनवेल, उरण तालुक्यातील अनेक पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 1) शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील मलबार हिल येथील मुुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. याआधी पनवेलमधील शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे,  जिल्हा सचिव रूपेश पाटील, उपशहर प्रमुख मंगेश रानवडे, इम्तियाज शेख आदींनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेनेपाठोपाठ आता मनसेला खिंडार पडले आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply