Breaking News

उलवे नोडमध्ये हेल्थकेअर क्लिनीक सुरू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

उलवे नोड सेक्टर 21 येथे नव्याने नुलाईफ हेल्थकेअर आणि स्कीन क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनीकचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 4) झाले. या वेळी समाजामध्ये सहभागी होत समाजाची सेवा करायची आहे, अशी भावना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली.

उलवे नोड परिसर वेगाने विकसीत होत आहे. त्यामुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून, नव नवीन उद्योग आणि व्यवसाय या परिसरात मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. त्याअंतर्गत डॉ. विनायक रुपदास आणि डॉ. स्वाती सोनोन-रुपदास यांनी उलवे नोड सेक्टर 21, प्लॉट 20 या ठिकाणी ‘नुलाईफ हेल्थकेअर आणि स्कीन क्लिनीक सुरू केले आहे.

या वेळी भाजपचे उलवे नोड 1चे अध्यक्ष मदन पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, गिता ठाकूर, निकीता खारकर, युवा मोर्चाचे उलवड नोड अध्यक्ष निलेश खारकर, डॉ. विलास सोनोन, धिरज ओवळेकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply