Breaking News

रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान

रोहे : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात मेमु सेवा वाढवून मिळाव्यात आणि मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा रोहा येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे संघर्ष समिती त़र्फे रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने रेल्वे प्रवशांनी आपले पास रोहा, निडी, नागोठणे, कासू येथूनच काढावेत, असे आवाहन रेल्वे संघर्ष समितीने केले आहे.

सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास कारावा आणि रोहा-दिवा मेमु गाडी स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही रोहा रेल्वे संघर्ष समितीने केले आहे.

उत्पन्न वाढल्यास रोहा-दिवा मेमुच्या फेर्‍या वाढतील. त्यासाठी समिती तर्फे निडी, नागोठणे आणि कासू या रेल्वे स्थानकातदेखील तिकीट जनजागृती राबविण्यात येणार आहे.

-फैसल अधिकारी, अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती-रोहा

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply