मुंबई : प्रतिनिधी
आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. विरोधकांना त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे, कारण ते आधी सरकारमध्ये होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी (दि. 16) पलटवार केला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेवटी लोकशाहीत तत्त्व असतात, भूमिका असते, विचार असतो. आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमचे, आमच्या आमदारांचे, खासदारांचे जे स्वागत होत आहे ते झाले असते का?
महाराष्ट्रात एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही. हा दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. म्हणजे निसर्गानेही आमच्या सरकारला साथ दिलीय. विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे आपल्या पत्रकार परिषदेत मांडले. आम्हाला सात पानी पत्र दिले आहे. मला वाटले हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे की काय, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणे हे कर्तव्य आहे आणि ते आम्ही चोख बजावू, असेही ते म्हणाले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …