पनवेल ः शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचा शुभारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला, तर या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंझारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील, अमेय देशमुख, प्रदूम खुटले, संतोह कुंवर, स्वरूप वाणी आदी उपस्थित होते. प्रारंभी बाळगोपाळांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper