Breaking News

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल उद्या पेणमध्ये

पेण : प्रतिनिधी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय जलजीवन मंत्री प्रल्हादसिंह पटेल कोकण व रायगड दौर्‍यावर आले असून बुधवारी (दि. 24) पेणमध्ये  त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी भाजपचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे संयोजक वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथील वनस्पतीदेवी बँकेच्या सभागृहात रविवारी (दि. 21) आढावा बैठक घेण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत भापचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणावयाचे असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रणनिती तयार केली आहे. त्यानुसार केंद्रीय जलजीवन मंत्री प्रल्हादसिंह पटेल कोकण व रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौर्‍यावर आले आहेत. लोकसभा निवडणूक होईपर्यंत ते हर एक महिन्यातून आपल्याकडे उपस्थित राहणार आहेत. ना. प्रल्हादसिंह पटेल बुधवारी आपल्या विभागात येत आहेत.  पेण तालुक्याला त्याचा मोठा फायदा करून घ्यावा लागेल, असे वैकुंठ पाटील यांनी या बैठकीत सांगितले.  केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते वाशी विभागातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. बुधवारी होणार्‍या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी या वेळी केले. भाजपचे पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, वाशी गावचे सरपंच गोरख पाटील, दादर गावचे सरपंच विजय पाटील, वढाव सरपंच पूजा पाटील, जितू म्हात्रे, सूर्यहास पाटील यांच्यासह वाशी विभागातील अनेक गावातील सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते या आढावा बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply