Breaking News

माणगावातील शिक्षक कॉलनीत घरफोडी

सोन्याचे मंगळसूत्र घेऊन अज्ञात चोरटा फरार

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव दत्तनगर भागातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोमवारी (दि. 29) सायंकाळी घरातील 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला.

विश्वनाथ हुल्लनाईक तालिमकर (वय 52, रा. शिक्षक कॉलनी, दत्तनगर, माणगाव) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा सोमवारी सायंकाळी 4 ते 5  वाजण्याच्या सुमारास तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. आणि बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन तो फरार झाला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस नाईक एन. एस. धनावडे करीत आहेत.

Check Also

अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …

Leave a Reply