Breaking News

पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला

कराची ः वृत्तसंस्था

पर्ल काँटीनेंटल या पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. सध्या या ठिकाणी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असल्याचे समजते. पाकिस्तानातील ग्वादर या ठिकाणी असलेल्या पर्ल काँटीनेंटल हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवादी हल्ल्यामुळे पंचताराकित हॉटेलमधील बहुतांश पाहुण्यांना बाहेर काढण्यात आल्याचेही समजते. दहशवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याची पाकिस्तानी सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी पाकिस्तानमधील ग्वादरमध्येच झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या जवानांसह 14 जण मारले गेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच हा हल्ला झाला होता.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply