Breaking News

मुंबईत ‘ईडी’चे छापे; 431 किलो सोने-चांदी जप्त

मुंबई : पारेख अ‍ॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीशी संबंधित झालेल्या पैशांच्या अफरातफरप्रकरणी (मनी लॉण्डरिंग) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 14) मुंबईतील रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स यांच्या चार ठिकाणी छापे टाकले. या वेळी एकूण 431 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली. सन 2018मध्ये पारेख अ‍ॅल्युमिनेक्स लि. कंपनीविरुद्ध 2296 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक आणि मनी लॉण्डरिंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रक्षा बुलियन्स आणि क्लासिक मार्बल्स यांच्यात काही आर्थिक व्यवहार समोर आले. त्यानुसार ईडीने दोघांशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply