खोपोली : प्रतिनिधी
खालापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत अॅड. सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अॅड.सागर चौगुले व सचिवपदी अॅड. अनघा कानिटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. जितेकर यांनी या वेळी जाहीर केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper