Breaking News

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर डोलवी गावाजवळ शुक्रवारी (दि. 11) पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी जखमी होऊन मृत पावल्याची घटना घडली आहे.

सुरेंद्र नगिना चौरसिया (रा. डोलवी) असे या मृत पादचार्‍याचे नाव असून तो मुंबई-गोवा महामार्गावरुन पायी चालत जात होता. या अपघाताची खबर न देताच ट्रक चालक फरार झाला. 

या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार एन. आर. पाटील  करीत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply