Breaking News

टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत-पाक महामुकाबला

मेलबर्न : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 23) लढत होणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी मानली जात आहे.
सुपर 12 फेरीसाठी भारत आणि पाकिस्तान संघ थेट पात्र ठरले असून त्यांचा दुसर्‍या गटात समावेश आहे. यापूर्वी उभय संघ विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 12 वेळा भारताने बाजी मारली, तर एकदा पाकिस्तान जिंकला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत हे संघ दोनदा एकमेकांशी भिडले. त्यात त्यांचा प्रत्येकी एक विजय व एक पराभव झाला. त्यामुळे आता टी-20 वर्ल्डकपमध्ये काय होणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply