Breaking News

मुरूड आगारातील गाड्या रस्त्यातच होतायेत बंद; प्रवासी हैराण

मुरूड ः प्रतिनिधी    

मुरूड आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या उपलब्ध न झाल्याने जुन्या गाड्यांवरच कारभार सुरू आहे, मात्र जुन्या गाड्या आता सातत्याने बंद पडू लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी (दि. 7) मुरूड-मुंबई गाडी (क्र. एमएच 14 बीटी 3058) नांदगाव येथील स्टेट बँकेजवळ बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना मध्येच थांबावे लागले. याबाबत चालक व वाहकांना विचारले असता त्यांनी सांगितले, गाडीचे गियर पडत नाही. त्यामुळे गाडी पुढे कशी जाणार? त्यामुळे गाडी मध्येच थांबवण्यात आली. या गाडीमध्ये मुंबईला थेट जाणारे प्रवासी असतानासुद्धा त्यांना मध्येच उतरावयास लागले. जवळपास दीड तास होऊनही दुसरी गाडी उपलब्ध न झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. आगर व्यवस्थापकांना संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. या आगारामधून गाड्यासुद्धा वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची नाराजी वाढत आहे. गाडीचे आरक्षण करूनसुद्धा गाडी दीड तास उशिरा सुटत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply