बुधवारी न्यूझीलंड-पाकिस्तान पहिली सेमीफायनल

सिडनी : वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमधील पहिल्या सामन्यात पहिल्या गटातील अव्वल स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या गटामध्ये दुसर्‍या स्थानी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सिडनीच्या मैदानावर बुधवारी (दि. 9) हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना खेळवला जाईल.
उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी किंवा अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस झाल्यास तो सामना अतिरिक्त राखीव दिवशी म्हणजेच पुढल्या दिवशी खेळवला जाणार आहे. सामना पावसामुळे नियोजित दिवशी रद्द झाल्यास तो दुसर्‍या दिवशी नियोजित मैदानावरच खेळवला जाईल. सामन्याच्या दिवशी पावसामुळे सामना अर्धवट सोडावा लागला, तर तो उर्वरित सामना दुसर्‍या दिवशी खेळवला जाईल.
या सामन्यातील खेळ दुसर्‍या दिवशी जैसे थे स्थितीत सुरू होईल.
राखीव दिवशीही पाऊस पडला तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ हा दोन्ही दिवस पावसाचा व्यत्यय आल्यास उपांत्य सामन्याचा विजयी संघ म्हणून घोषित केला जाईल.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply